स्पंदन खाकाळ याने राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्य पदक पटकावले.
चि.स्पंदनची धनुर्विद्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
आष्टी : आष्टी तालुक्यातील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित पिंपळेश्वर विद्यालय पिंपळा येथे शिक्षक म्हणून कार्यरत असलेले अंभोरा येथील रहीवाशी संदिप रघुनाथ खाकाळ यांचा मुलगा चि.स्पंदन संदीप खाकाळ याने राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये रौप्य पदक (सिल्वर मेडल) मिळवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. चि.स्पंदन संदिप खाकाळ हा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सैनिक स्कूल लोणी या ठिकाणी इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत असून तो सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र स्टेट फील्ड फेडरेशन मार्फत राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेमध्ये शाळेच्या वतीने सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये स्पंदन खाकाळ याने रौप्त पदक पटकावले असून दि.२४ मार्च २०२२ पासून होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी चौदा वर्षांखालील गटात त्याची निवड झाली आहे.
आष्टी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासह क्रिडा क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहेत हे यापूर्वीही अनेकवेळा सिद्ध झालं आहे. मागील काही वर्षात शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संचलित पिंपळेश्वर विद्यालय पिंपळा येथील मुलींचा कबड्डी संघ क्रीडा शिक्षक सुनिल वाळके, दिलीप सरोदे, नानासाहेब जगधने यांच्या मार्गदर्शनामुळे सलग तीन वर्षे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेता होऊन पिंपळा सारख्या ग्रामीण भागातील मुलींनी कबड्डीच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन बीड जिल्ह्यासह आष्टी तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहचवले होते. आता त्याच विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक संदिप खाकाळ यांचे चिरंजीव स्पंदन यानेही राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेत रौप्य पदक मिळवून यश संपादन केल्याने स्पंदन खाकाळ या विद्यार्थ्याच्या खास यशाबद्दल खा.सुजय विखे पाटील, आष्टी, पाटोदा, शिरुर का. विधानसभा मतदारसंघाचे नेते मा.आ.भीमराव धोंडे साहेब, डॉ.अजय दादा धोंडे, जेष्ठ संचालक विठ्ठलराव बनसोडे, माजी कार्यकारी संचालक दिलीपराव काळे, जेष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे, आष्टी पं.स.गटशिक्षणाधिकारी सुधाकर यादव, अहमदनगर येथील शिवशंभो प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.शिवाजी आण्णा कराळे, माजी जि.प.सदस्य सुखदेवराव खाकाळ, स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे संचालक महादेव आमले, पिंपळेश्वर विद्यालयाचे प्राचार्य विष्णू विधाते, अंबेश्वर विद्यालयाचे शिक्षक सोन्याबापु खाकाळ सर, नानासाहेब जगधने सर, तुषार काळे सर, प्रा. अनिल खुरंगे सर, सुनिल वाळके सर, तळेकर सर, अजिनाथ औटे सर, कोतकर सर, गाडे सर, शिंदे सर, सोनवणे सर, यांच्यासह अहमदनगर व बीड जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार व इतरांनी अभिनंदन करुन पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.