ताज्या बातम्या

शेतकऱ्यांनो अर्ध्या किमतीत ट्रॅक्टर मिळवण्यासाठी कोणती आहे योजना ; जाणूण घ्या कागदपत्रांची यादी


शेतीची सर्व कामे ट्रॅक्टरद्वारे पार पाडली जात आहेत.पूर्वमशागत पासून तर काढणीपर्यंत आणि काढणी झाल्यानंतर शेत मालाची वाहतूक करण्यासाठी सर्व ठिकाणी ट्रॅक्टर उपयोगी पडत आहे. ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरत असले तरी असे असंख्य अल्पभूधारक व गरीब शेतकरी आहे ज्यांना ट्रॅक्टर खरेदी करणे अशक्य आहे. बड्या शेतकऱ्यांकडे काही दशकांपूर्वीच ट्रॅक्टर आले आहेत मात्र अजूनही गरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर उपलब्ध झालेले नाही त्यामुळे अशा शेतकऱ्यांच्या उत्पादनात मोठी घट अजूनही कायम आहे.

अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांची ही समस्या हेरून केंद्र सरकारने एक भन्नाट योजना कार्यान्वित केली आहे. केंद्र सरकारने देशातील अल्पभूधारक व गरीब शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदी करता यावे यासाठी पीएम किसान ट्रॅक्टर योजना अमलात आणली आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत गरीब अल्पभूधारक शेतकऱ्यांना बँकेकडून अनुदान दिले जात असते. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्के अनुदान ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी तसेच कृषी उपकरणांची खरेदी करण्यासाठी प्राप्त होत असते. शेतकरी मित्रांनो जर आपणास पीएम किसान ट्रॅक्टर योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपणास आपल्या जवळच्या बँकेशी किंवा नोडल अधिकाऱ्याशी संपर्क करावा लागणार आहे. या ठिकाणी आपणास आपल्या राज्य शासनाच्या योजना अंतर्गत अर्ज करावा लागू शकतो. तुम्ही मशिनरी बँक अंतर्गत योजनेचा लाभ घेतला तर आपणास 50 ते 80 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जाऊ शकते.

पीएम किसान ट्रॅक्टर योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान थेट लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग केले जाते. या योजनेत एका शेतकरी कुटुंबातील एकच व्यक्ती पात्र ठरत असतो. या योजनेसाठी जर आपण पात्र असाल आणि आपणास अर्ज करायचा असेल तर आपण आपल्या कृषी विभागात किंवा जवळच्या सीएससी केंद्रात जाऊन अर्ज घ्यावा लागेल. अर्ज घेतल्यानंतर आपणास तो अर्ज व्यवस्थित रित्या भरावा लागेल आणि लोक सेवा केंद्रात जाऊन सबमिट करावा लागेल, असे असले तरी भारतात असे अनेक राज्य आहेत ज्या राज्यात या योजनेसाठी ऑनलाइन फॉर्म मागविले जात आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 20 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत अनुदान दिले जाते मात्र असे असले तरी वेगवेगळ्या राज्यात यात कमी जास्त होऊ शकतो. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यात पैसे ट्रान्स्फर केले जातात म्हणून शेतकऱ्यांचे बँक खाते असणे बंधनकारक आहे.

या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

शेतकरी मित्रांना जर आपणास या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर आपणांस आधार कार्ड, जमिनीची कागदपत्रे, बँक खाते तपशील अर्थात बँक पासबुक, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, ओळखीचा पुरावा (उदा. मतदार ओळखपत्र / पॅन कार्ड / पासपोर्ट / आधार कार्ड / ड्रायव्हिंग लायसन्स इ.) या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *