आष्टी : आष्टी येथील छत्रपती शाहू-फुले-आंबेडकर कृषी महाविद्यालयात कृषी कीटकशास्त्र विभागामध्ये आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांचे रेशीम उत्पादन तंत्रज्ञान प्रकल्प पूर्ण झाले महाविद्यालयांमध्ये एक एकर क्षेत्रावर व्ही वन या सुधारित जातीच्या तुतीची तीन वर्षापूर्वी 4 बाय 2 फूट या अंतरावर लागवड केलेली आहे तसेच 40 बाय 20 फुटाचे किटक संगोपन गृह बांधलेले आहे महाविद्यालयांमधील आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी जिल्हा रेशीम कार्यालय बीड येथून 800 रुपयांचे 50 अंडीपुंज आणले होते सुरुवातीला अंडयामधुन मधून अळ्या बाहेर आल्यानंतर त्यांना तुतीची पाने कापून टाकावी लागतात साधारणता तिसऱ्या अवस्थे नंतर त्याला दिवसातून दोन वेळा पाला टाकला जातो तसेच निर्जंतुकीकरणासाठी तिसऱ्या अवस्थेपर्यंत अळ्या वर पाच ग्रॅम पर 100 अळी चौथ्या-पाचव्या अवस्थेमध्ये दहा ग्रॅम पर 100 अळी विरी गेलेल्या चुना पावडरची धुरळणी करावी तसेच धुरळणी कात टाकणे व कोष गुंडाळण्याच्या अवस्थेत करू नये .साधारणता तीस दिवसांमध्ये अळ्या कोष मध्ये जातात 50 अंडीपुंजापासून 40 किलो कोष निर्मिती होऊन बाजारामध्ये पाचशे ते सहाशे रुपये किलो दर मिळतो विद्यार्थ्यांनी दोन बॅच मध्ये 80 किलो कोष तयार झाले. सदर प्रकल्पा साठी प्रकल्प अधिकारी प्राध्यापक काळे पी आर आणि प्राध्यापक मिसाळ एल एस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रकल्पामध्ये विद्यार्थी पोठरे वंदना, कोकाटे वर्षा, काकडे राम, मानकर विशाल, लोखंडे ऋषिकेश ,गणेश कवलिंगे, माने दिनेश , शीतल सोनेकर , यांनी सहभाग घेतला संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. डी बी राऊत आणि प्राचार्य डॉ.आरसुळ एस आर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले
With Product You Purchase
Subscribe to our mailing list to get the new updates!
Lorem ipsum dolor sit amet, consectetur.