बीड : बीड जिल्ह्यातील अहेर वडगाव या ठिकाणाहून तीन जीवलगर मित्र बुलेटवर बसून बीडच्या दिशेने चालले होते. त्यावेळी एसटी आणि बुलेट यांचा अपघात झाला आहे.हा अपघात इतका भयंकर होता की या अपघातात बुलेटवर बसलेल्या तिन्ही जीवलग मित्रांचा मृत्यू झाला आहे. तिन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे.
बुधवारी रात्री ८ च्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. पारसनाथ रोहिटे, कृष्णा शेळके, अक्षय मुळे अशी अपघात झालेल्या तीन जिवलग मित्रांची नावं आहेत. हे तिघेही रात्री आठच्या सुमारास बुलेट क्रमांक MH 23, L 7227 या क्रमांकाच्या बुलेटवरून अहेर वडगावहून बीडच्या दिशेने येत होते. त्याचवेळी धुळे सोलापूर रस्त्यावरून समोरून आलेल्या बसने समोरून बुलेटला धडक दिली.
या अपघातात पारसनाथ आणि कृष्णाचा जागीच मृत्यू झाला. तर अक्षयला जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अक्षयचाही मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले