ताज्या बातम्या

PM मोदींच्या हास्ते इंडिया गेटवर नेताजींच्या होलोग्राम प्रतिमेचे अनावरण


नवी दिल्ली : आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त इंडिया गेटवर त्यांच्या होलोग्राम प्रतिमेचं अनावरण केलं आहे. याच ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा ग्रेनाईटचा पुतळा बसवण्यात येणार आहे.यादरम्यान पंतप्रधान मोदी यांनी या पायाभरणी समारंभात 2019, 2020, 2021 आणि 2022 या वर्षांसाठी सुभाष चंद्र बोस आपदा प्रबंध पुरस्कार प्रदान केले आहेत.

यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटलंय की, या ठिकाणाहून आपली संसद जवळ आहे. क्रियाशीलता आणि लोकनिष्ठेचं प्रतिक असणारे अनेक भवन जवळ आहेत. वीर शहिदांचं नॅशनल मेमोरियलदेखील जवळ आहे. त्यामुळेच हे ठिकाण सर्वांना प्रेरणा देईल. आज आपण इंडिया गेटवर अमृत महोत्सव साजरा करत आहोत आणि नेताजींना आदरांजी देत आहोत.पुढे ते म्हणाले की, नेतांजींनी स्वाधीन आणि स्वतंत्र भारताचा विश्वास दिला. ज्यांनी मोठ्या गर्वाने, मोठ्या आत्मविश्वासाने साहसाने, इंग्रजी सत्तेसमोर सांगितलं की मी स्वातंत्र्याची भीक घेणार नाही तर मी ती हिसकावून घेईन. ज्यांनी भारताच्या जमिनीवर पहिलं स्वतंत्र सरकार स्थापन केलं. त्यांना आदरांजली म्हणून आज नेताजींची प्रतिमा डिजीटल पद्धतीने इंडिया गेटवर स्थापन झालीये. लवकरच या ठिकाणी ग्रेनाईटची प्रतिमा लावण्यात येईल. ही स्वांतत्र्याच्या नायकाला आदरांजली आहे, असं त्यांनी म्हटलंय.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *