भारतातील एकमेव पुरुषोत्तम मंदिर महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात
बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीकाठी तेराव्या शतकातील हेमाडपंती बांधकाम असलेले भगवान विष्णूचा अवतार पुरुषोत्तमाचे देशातील एकमेव मंदिर अाहे. दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक मासात (धोंड्याचा महिना) पुरुषोत्तमाच्या दर्शनाचे महात्म्य असल्याने या गावास वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे.
अधिक मास हा धार्मिक व्रत वैकल्यांचा महिना म्हणून ओळखला जातो. दान धर्म, धार्मिक विधी, पूजा पाठ या महिन्यात मोठ्या प्रमाणात होत असतात. धोंडा महिना, पुरुषोत्तम मास या नावांनीही हा महिना ओळखला जातो.
भगवान पुरुषोत्तमाची पूजा या महिन्यात मोठ्या प्रमाणात होत असते. भारतातील एकमेव असणारे पुरुषोत्तमाचे मंदिर महाराष्ट्रात असून, पुरुषोत्तमपुरी येथे सध्या भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. हिंदू धर्मात अधिक महिन्यात भगवान पुरुषोत्तमाच्या पूजेचे महत्त्व आहे. त्यामुळे राज्यातूनच नाही; तर परराज्यातूनही मोठ्या सं’येने भक्त भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी येत असतात. प्रत्येक गावखेड्यात विविध देवदेवतांची मंदिरे असतात.
मात्र, भगवान पुरुषोत्तमाचे मंदिर संपूर्ण भारतात एकच असल्याचे सांगितले जाते. बीड जिल्ह्यातील माजलगावहून 22 किलोमीटर अंतराव पुरुषोत्तम पुरी हे गाव आहे. Purushottam temple या गावात हे मंदिर आहे. गोदावरी तटावर हे हेमाडपंथी मंदिर असून, या मंदिराचे बांधकाम सुमारे 1500 वर्षांपूर्वी झाल्याचा शिलालेख येथे आहे. या मंदिराचा कळस व बांधणी ही केदारनाथ मंदिर (उत्तराखंड) पद्धतीची आहे. शेजारीच वरदविनायक, सहलक्षेश्वर महादेव, पार्वती पादुका मंदीर आहे. ही दोन्ही मंदिरे जुनी असल्याचे दिसते. वरदविनायक मंदीर हे वृंदावनातील कृष्णमंदीराची प्रतिकृती असल्याचे दिसते. मु’य पुरुषोत्तम मंदीरातील पुरुषोत्तमाची मूर्ती ही गंडळी शिलेची असून, ती स्वयंभू असल्याचे सांगितले जाते. चतुर्थभुजाधारी पुरूषोत्तमाच्या हातात शंख, चक’, पद्म असून, मूर्ती मनमोहक अशी आहे.
मंदिर स्थापत्य कलेचा आदर्श नमुनाहे मंदिर स्थापत्य कलेचा आदर्श नमुना आहे. मंदिराच्या विटा पाण्यावर तरंगतात, असे मानले जाते. मंदिरातील गरुडध्वजा पंढरपूर येथील मंदिराची आठवण करून देतात, असे भाविक सांगतात. या मंदिराची आ’यायिका अशी की, पूर्वी शार्दुल नावाचा राक्षस Purushottam temple पंचक’ोशीतील जनतेला त्रास देत होता. भगवान विष्णू यांनी पुरुषोत्तम अवतार घेऊन त्याचा शिरच्छेद केला. ते चक’ गोदावरीच्या पाण्यात धुतले म्हणून आजदेखील हे तीर्थ चक’तीर्थ म्हणून ओळखले जाते. भाविक या चक’तीर्थावर स्नान करतात व पशुधारी सावळ्याचे म्हणजेच विठोबाचे दर्शन घेतात