गर्भपातातील मातेच्या मृत्युप्रकरणात जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांनी ४ सदस्यीय समिती नेमली – अड.संगिता धसे,डाॅ.गणेश ढवळे
गर्भपातातील मातेच्या मृत्युप्रकरणात जिल्हाशल्यचिकित्सक डाॅ.सुरेश साबळे यांनी ४ सदस्यीय समिती नेमली :-अड.संगिता धसे,डाॅ.गणेश ढवळे
बीड : नियमबाह्य गर्भपात प्रकरणातील माताच्या मृत्युप्रकरणात अड.संगीता धसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळातील सदस्य सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ,मोहम्मद मोईज्जोदीन,शेख मुबीन बीडकर ,शेख युनुस च-हाटकर,यांनी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांची भेट घेऊन चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केल्यानंतर अखेर डाॅ.सुरेश साबळे यांनी ४ सदस्यांची समिती नेमली असुन डाॅ.संतोष शहाणे,वैद्यकीय अधिक्षक रायमोहा बीड,डाॅ.अभिषेक जाधव,वैद्यकीय आधिकारी जिल्हारूग्णालय बीड,डाॅ.राजश्री शिंदे वैद्यकीय आधिकारी जिल्हारूग्णालय बीड,श्री.प्रकाश सानप,कार्यालयीन अधीक्षक जिल्हारूग्णालय बीड यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
सविस्तर माहीतीस्तव
______
बीड जिल्हारूग्णालयात नियमबाह्य गर्भपातामुळे मृत्युमुखी पडलेल्या ३ मुलीच्या सीताबाई गणेश गाडे वय ३० वर्षे रा.बक्करवाडी ता. बीड यांच्यामुळे बीड जिल्ह्य़ातील मुलीचे लिंगनिदान करणे व मुलाच्या हव्यासापोटी मुलीचा गर्भपात करण्याचे पातक केवळ पैशासाठी काही वैद्यकीय व्यावसायाला काळिमा फासणा-या निष्ठुर लोकांकडुन होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज असून ३ मुलींची आई असलेल्या सीताबाई यांची ४ थ्यांदा गर्भचाचणी कुठे केली?? कोणत्या दवाखान्यात केली ? गर्भाशयाची पिशवी फाटुन अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे मृत्यु झाल्याचे वैद्यकीय तज्ञांनी शवविच्छेदन केल्यानंतर नमुद केले असून संबधित प्रकरणात जर गर्भपाताच्या गोळ्या घेतल्या असतील तर कोणत्या मेडीकल मधुन घेतल्या आदिंची चौकशी करण्याची गरज असून संबधित प्रकरणात सखोल चौकशी करून कठोर कारवाईची मागणी अड.संगीता धसे यांनी जिल्हाशल्यचिकित्सक जिल्हारूग्णालय बीड डाॅ.सुरेश साबळे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली होती.
बीड जिल्हा यापुर्वीच गर्भलिंग निदान व मुलींचा गर्भपात करून मुलींचा जन्मदर खालावल्या प्रकरणात बदनाम झाला असून त्यामधुन बीड जिल्ह्य़ाची मोठ्याप्रमाणात बदनामी झाल्यानंतर जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेने जनजागृती बरोबरच कठोर उपाययोजना करत मुलींचा जन्मदर समाधानकारक उंचीवर आणुन ठेवला असतानाच या प्रकारे बीड जिल्ह्य़ातील गर्भलिंग निदान व मुलींच्या गर्भपाताचे वास्तव समोर आल्यामुळे जिल्हा हादरला असुन मुलाच्या हव्यासापोटी मुलींचे गर्भपात पैशासाठी काही वैद्यकीय व्यवसायिकांकडुन करण्यात येत असून संपुर्ण वैद्यकीय व्यवसायाला बदनाम करणा-यांवर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य, मोहम्मद मोईज्जोदीन,शेख मुबीन,आदि शिष्टमंडळात सहभागी होते.