बीड जिल्हाबीड शहर

ग्राहक आयोगाने उस्मानाबाद बँकेला ४००० रू चा दंड केला,कोर्टाने ४२० दाखल केला तरी पोलिसांना देशमुख आणि काकडे सापडेनात.


बीड : बीड, जिल्हा ग्राहक आयोगाने ४००० रु चा दंड केलेला असताना व बीड जिल्हा प्रथम वर्ग न्यायधिशांनी ४२० चा गुन्हा दाखल झालेला असतांना देखील उस्मानाबाद बँकेचे मॕनेजर बालाजी देशमुख आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष वैभव काकडे हे दोन आरोपी पोलिसांना अद्याप सापडले नसल्याने किबंहुना पोलिस जाणीवपूर्वक त्यांना शोधत नसल्यामुळे आता आपण उस्मानाबाद बॕकेच्या इतरही आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी कोर्ट व संबधित प्रशासनाकडे करणार असल्याचे या प्रकरणातील तक्रादार अशोक किसनराव सुरवसे यांनी म्हटले आहे.
याबाबत सुरवसे यांनी दिलेल्या पञकात म्हटले आहे कि, उस्मानाबाद बँकेत माझे व वैभव काकडे यांचे संयुक्त बँक खाते आहे वैभव काकडे यांनी बँक मॕनेजर देशमुख यांना हाताशी धरून या खात्यावरील तीन लाख रूपयांची रक्कम परस्पर काढल्याने आपण बँकेकडे तक्रार केली होती, परंतु बँकेने यात कुठलीच कार्यवाही न केल्याने आपण जिल्हा ग्राहक आयोगाकडे लेखी तक्रार केली यात आरोपीनां ४००० हजार रुपये चा दंड आयोगाने केला,पंरतु आरोपी देशमुख व काकडे यांनी आयोगाच्या आदेशास जुमानले नाही.
त्यामुळे सुरवसे यांनी मा जिल्हा न्यायालयात याची दाद मागितली तेव्हा मा.न्यायालयात या प्रकरणी उस्मानाबाद बँक मँनेर देशमुख व वैभव काकडे हे दोषी आढळल्याने त्यांना कलम ४१९, ४२०,४६८,४७१, ३४.या प्रमाणे गुन्हा दाखल आहेत.
परंतु असे असताना देखील बालाजी देशमुख व वैभव काकडे हे पोलीसांना सापडत नाहीत.
न्यायालयाच्या आदेशास स्थगिती मिळवण्याचा प्रयत्न देखील आरोपीकडुन केला गेला माञ स्थगिती मिळाली नाही.
त्यामुळे जर आरोपीवर न्यायालयाच्या आदेश प्रमाणे कार्यवाही झाली नाही तर आपण उस्मानाबाद बँकेच्या इतर आर्थीक गुन्ह्या प्रकरणी योग्य त्या मार्गाने तक्रार करू असे तक्रारदार अशोक सुरवसे यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *