आष्टी येथे माजी आ.भीमराव धोंडे
संपर्क कार्यालयात भाजपा वर्धापनदिन उत्साहात साजरा
*****************************
खा.डाॕ.प्रीतमताई मुंडे यांचे उत्कृष्ट कार्य आहे त्याच पुन्हा खासदार होतील- माजी आ.भीमराव धोंडे
आष्टी : ( गोरख मोरे) भारतीय जनता पार्टी या पक्षाचा दि.६ एप्रिल हा स्थापना दिवस असून यानिमित्त आज देशभरात विविध ठिकाणी भाजपा ध्वजारोहण,भारत मातेचे पूजन,पदयात्रा,
दुचाकी रॅली,आजी-माजी सैनिक,जेष्ठ कार्यकर्ते,नागरिक, प्रबुद्ध नागरिक यांचा सन्मान अशा विविध प्रकारे मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.बीड लोकसभा मतदार संघात विद्दमान खा.डाॕ.प्रीतमताई मुंडे यांचे चांगले कार्य आहे.त्यामुळे त्याच पुन्हा खासदार होतील
असे प्रतिपादन भाजपनेते माजी आ.भीमराव धोंडे आष्टी,पाटोदा,शिरुर का. विधानसभा मतदार संघाचे भाजपा नेते माजी आ.भीमराव धोंडे यांच्या आष्टी येथील संपर्क कार्यालयात भारतीय जनता पार्टीचा वर्धापनदिन भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
यावेळी डॉ.शामाप्रसाद मुखर्जी,पंडीत दीनदयाळ उपाध्यायजी,माजी पंतप्रधान अटलबिहारीजी वाजपेयी,माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचे प्रतिमा पुजन करुन भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या राजकीय, सामाजिक कार्यासह पक्षाच्या विस्तारासाठी योगदान दिलेले जेष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.
याप्रसंगी भाजपा नेते माजी आ.भीमराव धोंडे यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले. यावेळी धोंडे म्हणाले की,पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे काम विश्वविक्रमी आहे.जगातील लोकप्रिय नेते आहेत. कार्यकर्त्यांनी भाजप पक्षात सक्रिय व्हावे.आताच कुणीतरी आता भाषणात म्हणाले की,धोंडे लोकसभा लढवतील परंतू ते बरोबर नाही. खासदार डाॕ.प्रीतमताई मुंडे यांच पुन्हा खासदार होणार आहेत.खा.डाॕ.प्रीतमताई मुंडे यांचे उत्कृष्ट कार्य आहे त्याच पुन्हा खासदार होतील
यावेळी भाजपा अनु.जात. प्रदेश उपाध्यक्ष ॲड.वाल्मिक निकाळजे म्हणाले की,बीडचे खासदारकीसाठी आ.सुरेश धस आणि भीमराव धोंडे यांच्या नावाची चाचपणी वरिष्ठ पातळीवरुन सुरु असल्याचा यावेळी ॲड.वाल्मिकतात्या निकाळजे यांनी गौप्यस्फोट यावेळी केला.
भाजपा तालुकाध्यक्ष ॲड.हनुमंत थोरवे,रिपाई तालुकाध्यक्ष अशोक साळवे,
भाजपा बीड जिल्हा सचिव शंकर देशमुख,पं.स.सदस्य प्रा.दादासाहेब झांजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रम प्रसंगी भाजपा युवा मोर्चा बीड जिल्हा सरचिटणीस डॉ.अजयदादा धोंडे,ॲड.साहेबराव म्हस्के,
बबनआण्णा झांबरे,डॉ.
शैलजा गर्जे, जि.प.सदस्य सुरेश माळी,पं.स.चे माजी उपसभापती आदिनाथ सानप, भाजपचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ शिंदे,सरपंच संजय नालकोल, सरपंच राहुल काकडे,माजी पं.स.सदस्य बाबासाहेब गर्जे,नगरसेवक ज्ञानदेव राऊत, नगरसेवक दादासाहेब गर्जे,एन.टी.गर्जे, विठ्ठलराव लांडगे,अजिनाथ बेल्हेकर, संजय रक्ताटे,सरपंच आकाश तरटे,ॲड. नवनाथ विधाते, युवराज खटके, अतुल मुळे,बाबुराव कदम,जाकीर कुरेशी,शेख आज्जु भाई,
दादासाहेब जगताप,भीमराव विधाते,रामदास सांगळे, दादा विधाते आदि पदाधिकारी कार्यकर्ते व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वा आभार शंकर देशमुख यांनी मानले.