बीड : तेलगाव-माजलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी जवळ, कार व दुचाकीचा अपघात झाला आहे. यात दुचाकीवरील 2 जण ठार तर 10 वर्षांचा मुलगा गंभीर जखमी असून, कारमधील 5 असे एकूण 6 जण जखमी आहेत.सर्वांना बीड व अंबाजोगाई येथे उपचारासाठी हलविण्यात आले आहे. लक्ष्मण भिमराव विघ्णे वय 45 , सिध्देश्वर प्रल्हाद जाधव वय 35 असे मयताचे नावं आहेत. हे दोघे व सिध्देश्वर यांचा मुलगा ईश्वर जाधव हे तिघे पाहूण्याना भेटून दुचाकीवर येत होते.यावेळी तेलगाव-माजलगाव रस्त्यावरील शिंदेवाडी जवळ कार व दुचाकीचा अपघात झाला. यामुळं दोन्ही वाहने रस्त्याच्या खाली जाऊन खड्ड्यात पडली. यामध्ये दुचाकीवरील तिघांना गंभीर मार लागल्याने लक्ष्मण विघ्णे आणि सिध्देश्वर जाधव हे ठार झाले. तसेच ईश्वर जाधव वय 10 हा गंभीर जखमी झाला आहे.
तर कार खड्ड्यात पडल्याने, यातील नामदेव हेडे वय 44, परमेश्वर खेमाजी पवार वय 45, प्रीती विनोद पोखरकर वय 35, भारत अबाजी माने, किशोर रामभाऊ ठाकुर वय 35, ज्योती शंकर कदम हे जखमी आहेत. हे सर्व माजलगाव येथील सिध्देश्वर विद्यालयात शिक्षक आहेत. अंबाजोगाई येथे रहातात व तेथून माजलगाव येथे शाळेसाठी जाणे-येणे करतात. आजही नेहमी प्रमाणे शाळेला जाताना शिंदेवाडी फाट्यावर ही घटना घडली आहे. सर्व जखमींना अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.