आगळे - वेगळे

सुवर्णनगरीतले सागर मोतीलाल सपके ‘गोल्डमॅन’ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला


सुवर्णनगरीतले सागर मोतीलाल सपके ‘गोल्डमॅन’ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेला आले आहेत.
त्यांच्या अंगावर दीड किलो सोन्याचे दागिने आहेत.

सपके यांच्या आई राधाबाई यांच्या अंगावरही अर्धा किलो सोन्याचे दागिने असायचे. म्हणूनच सागरलाही सोने घालण्याची हौस वाटू लागली. ५ हजार रुपये प्रति तोळा असतानापासूनच त्यांनी सोने घालण्यास सुरुवात केली. सध्या जळगावकर ‘गोल्डमॅन’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

गिनीज बुकमध्ये फुगे यांची नोंद
राष्ट्रवादीचे दत्ता फुगे यांचा सोन्याचा शर्टही चांगलाच चर्चेत आला होता. सोन्याची बटणे, सोन्याची फुले, गळ्यात सोन्याच्या चेन, कडे असा पोषाख केला. जगातला सर्वात महागडा शर्ट घालणारी व्यक्ती म्हणून फुगे
यांची गिनीज बुकमध्ये नोंदही झाली.
पुण्यातील पहिले गोल्डन मॅन म्हणून मनसेचे माजी आमदार रमेश वांजळे यांचीही ओळख होती.

वजनदार दागिने
गोफ अर्धा किलोंचा गोफ, अंगठ्या नऊ तोळ्यांच्या, ब्रेसलेट ३३ तोळ्यांचे, चेन १० तोळ्यांची, असा दीड किलो सुवर्णभार पेलणारे सागर म्हणतात, सोन्याच्या वजनामुळे कधीतरी चक्करही येतात. रक्तदाबही वाढतो.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *