पुणे – स्वर्गिय आमदार मुक्ता टिळक यांच्या प्रथम जयंती निमित्ताने मुक्ता टिळक मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने येत्या 17 व 18 ऑगस्ट रोजी दोन दिवसीय मोफत कर्करोग उपचार, तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे.
टाटा कॅन्सर सेंटरचे तज्ञ डॉक्टर या शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन करणार आहे. कर्करोगावर उपचार सुरु असणाऱ्या तसेच या शिबिरात निदान होणाऱ्या प्रथम 100 रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत. या मध्ये केमोथेरपी, शस्त्रक्रिय आणि रेडियेशनचा समावेश आहे.
ज्या कर्करोगाशी मुक्ताताईंनी 5 वर्षे अत्यंत धैर्याने लढा दिला त्या कर्करोग पिडीत रुग्णांसाठी कार्य करण्याचा मुख्य उद्देश ठेऊन या फाउंडेशनची स्थापना करण्यात आली असून त्याद्वारे हे शिबिर घेण्यात येणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे संस्थापक शैलेश टिळक यांनी दिली. फाऊंडेशनचे संस्थापक कुणाल टिळक, चैत्राली टिळक, डॉ. शैलेश पुणतांबेकर उपस्थित होते.
लोकमान्य सभागृह, टिळक वाडा येथे सकाळी 10 ते सायं 5.00 वाजेपर्यंत हे शिबिर असणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ( 18 ऑगस्ट रोजी) सायं. 6 ते 8 या वेळेत इतर वैद्यकीय प्रणाली च्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या उपचारासंबंधी माहिती देण्यात येणार आहे. प्रसिद्ध सर्जन डॉ.शैलेश पुणतांबेकर कर्करोगासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत तर होमिओपॅथी उपचार पद्धतीसंबंधी डॉ.शैलेश देशपांडे मार्गदर्शन करतील.
प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. योगेश बेंडाळे यांच्या सहकारी डॉ. पूनम विरारी दृक श्राव्यय माध्यमातून आयुर्वेदिक उपचार पद्धती संबंधी देणार आहेत. तसेच टाटा कॅन्सर सेंटरचे तज्ञ डॉक्टर या शिबिरात सहभागी होणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन करणार असल्याचे शैलेश टिळक यांनी सांगितले. शिबिरात सहभागी होण्यासाठी 9422332988 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कुणाल टिळक यांनी केले आहे.