नवी मुंबई : एपीएमसी बाजारात वर्षभर परदेशी सफरचंद बाजारात दाखल होत असतात. जुलैमध्ये देशी सफरचंद दाखल होण्यास सुरुवात होते. एपीएमसी फळ बाजारात शिमला, हिमाचल प्रदेश मधील सफरचंद ,तसेच हिमाचल प्रदेशातील पेर दाखल होते.
परंतु यंदा त्याठिकाणी ही तापमान वाढले होते, त्यामुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे,त्याच बरोबर हंगामही लांबणीवर गेला आहे. आद्यप देशी सफरचंद बाजारात आवक होत नसून जुलै अखेर देशी सफरचंद आणि पेर बाजारात दाखल होण्यास सुरुवात होईल अशी महिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.
देशी फळांच्या हंगामाला सुरुवात होताच वर्षभर सुरू असलेलेल्या परदेशी फळांची मागणी कमी होते. पावसाळ्यात पेर, सीताफळ आणि सफरचंद ही फळे दाखल होण्यास सुरुवात होते. बाजारात देशी फळ दाखल होताच परदेशी पेर, सफरचंद यांची मागणी कमी होते. शिमला,काश्मीर, हिमाचल येथून सफरचंद दाखल होतात. देशी सफरचंद ही भरीव , रसरशीत आणि चवीला गोड असल्याने अधिक मागणी असते. देशी सफरचंदच्या तुलनेत परदेशी फळे अधिक महाग असतात. त्यामुळे ग्राहक देशी सफरचंदच्या प्रतीक्षेत आहेत.
यंदा अवघे ४०% उत्पादन यंदा तपमानाने उच्चांक गाठला होता. त्यामुळे कडक उष्णता होती. परिणामी सफरचंदच्या उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे अद्याप बाजारात देशी सफरचंद दाखल होण्यास सुरुवात झाली नाही. हवामान बदलाचा फटका बसल्याने यंदा अवघे ४०% उत्पादन असेल अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.