ताज्या बातम्या

तोरणा किल्ला माहिती


तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि अति विशाल किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे.

तोरणा किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला जिंकून घेतला होता.

तोरणा किल्ल्याचे दुसरे नाव प्रचंडगड आहे.

पुणे पासून तोरणा किल्ल्याचे अंतर 60 किलोमीटर आहे.

तोरणा किल्ल्यावरुन रायगड किल्ला, लिंगाणा,  राजगड किल्ला ,पुरंदर किल्ला   दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करत असताना इसवी सन 1647 मध्ये सर्वात पहिले तोरणा किल्ला जिंकला.

तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज फक्त 16 वर्षांचे होते

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला घेऊन स्वराज्य स्थापनेचे तोरणच बांधले असे म्हटले जाते.

नंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गडाची पाहणी केली तेव्हा किल्ल्याचे विस्तार पाहून महाराजांनी याचे नाव प्रचंडगड असे ठेवले.

तोरणा किल्ल्यावर सापडलेल्या गुप्त धनाचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड बांधण्यासाठी उपयोगात आणला.

तोरणा किल्ला हा 13व्या शतकात बांधला असेल अशी मान्यता आहे.

तोरणा किल्ला हा शिव पंथ यांनी बांधले असे म्हटले जाते.

याचा पुरावा म्हणजे गडावरील काही लेण्यांचा आणि अवशेषांवरून असे दिसून येते की हा किल्ला शिव पंथ यांचा आश्रम असावा.

इ. स. 1470 ते 1486 च्या काळात बहामनी राजवटीसाठी मलिक अहमद याने हा किल्ला जिंकून घेतला.

पुढे हा किल्ला निजामशाहीत आला नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला स्वराज्यात आणला याच्यावर काही इमारती बांधल्या.

 

 

छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या सुटकेनंतर अनेक किल्ल्याची पुनर्बांधणी केली.

त्यात महाराजांनी 5000 होन इतकी रक्कम तोरणा गडावर खर्च केली.

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तोरणा किल्ला मुघलांकडे गेला.

शंकराजी नारायण सचिवांनी तोरणा किल्ला परत स्वराज्यात आणला.

इसवी सन 1704 मध्ये औरंगजेब बादशहाने तोरणा किल्ल्याला वेढा घालून हा किल्ला जिंकून घेतला.

औरंगजेब बादशहाने तोरणा गडाचे नाव बदलून त्याचे नाव फुतुउल्गैब म्हणजे दैवी विजय असे ठेवले.

औरंगजेब बादशहाने तोरणा किल्ला असा एकमेव किल्ला आहे जो लढाई करून जिंकलेला आहे.

इसवी सन 1708 मध्ये सरनोबत नागोजी कोकाटे यांनी तोरणा गडावर लोक चढवून हा किल्ला स्वराज्यात आणला.

यानंतर तोरणा किल्ला कायम स्वराज्यातच राहिला.

पुरंदरच्या तहात पण हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांकडे होता.

तोरणा गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे 

बिनी दरवाजा

तोरणा गडावर जातांना पहिला दरवाजा लागतो तो बिनी दरवाजा आहे.

तोरणा दरवाजा

बिनी दरवाजातून आत गेल्यावर काही पायऱ्या लागतात त्या पायऱ्या सरळ तोरणाचा दरवाजाकडे जातात.

मेंगाई देवीचे मंदीर

तोरणा किल्ल्यावर मेंगाई देवीचे सर्वात प्राचीन मंदिर आहे.

झुंजार माची

झुंजार माचीवरून आपल्याला रायगड, लिंगाणा, राजगड, पुरंदर किल्ला, सिंहगड हे किल्ले दिसून येतात.

कोकण दरवाजा

झुंजार माचीवरून बुधला माचीकडे जाताना कोकण दरवाजा लागतो.

बुधला माची

कोकण दरवाजा आपल्याला बुधला माचीकडे जाता येते.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *